अधिकाऱ्याला धमकी, शिवीगाळ.. ऑडिओ रेकॉर्डींग व्हायरल.. | Viral Audio | Maharashtra News
#अधिकाऱ्याला_धमकी #ऑडिओरेकॉर्डिंग #व्हायरलऑडिओ #शिवीगाळ #महाराष्ट्रबातम्या #ब्रेकिंगन्यूज #MarathiNews #BreakingNews #ViralAudio #MaharashtraNews #ViralNews #Lokmat #lokmatnews
मंडळी ऐकलंत..हातपाय तोडीन म्हणून शिवीगाळ करत.. खासदारानं पंचायत समिती अधिकाऱ्याला धमकी दिल्याच्या या प्रकरणानं सध्या सोलापूरमध्ये खळबळ उडालीये.. या व्हायरल ऑडीओ क्लिपमध्ये म्हाडा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते हे अधिकाऱ्याला धमकी देत असल्याचा आरोप होतोय..
राज्यात मागच्या दिवसात घडलेल्या घटनांमध्ये लोकप्रतिनिधी गुंडांसारखे वागलेले सर्वांनीच पाहिलेत.. खासदार संजय दिना पाटलांनी वापरलेली भाषा, त्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रेचा राडा.. अन् आता ही नवी ऑडीओ रेकॉर्डींग.. हो.. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका वादग्रस्त प्रकरणाची भर पडली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एक कथित आणि वादग्रस्त ऑडिओ क्लिप समोर आलीये. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या ऑडीओ क्लिपमध्ये थेट पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला धमक्या दिल्या जातायत..
या ऑडिओ क्लिपमध्ये काय म्हटलंय..